वाचायला विचित्र वाटतं. पण हे सत्य आहे. पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंघ ह्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर मागील दहा वर्षांपासून सुरु असलेली सरकारी पैश्यांची चोरीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता पर्यत च्या माहिती नुसार 2,45,935 पेक्षा अधिक वृद्धत्व पेंशन घेणारे लोक खोट्या माहितीच्या आधारे पेंशन घेत आहेत. ह्यातले अनेक लोक तरुण आहेत, काही श्रीमंत आहेत आणि महत्वाचे म्हणजे 65,743 लोक मृत आहेत, तरी त्यांच्या नावाने पेंशन दिली जाते. तर काही लोकांनी पेंशन घेण्यासाठी चुकीची माहिती किंवा पत्ता दिला आहे. 42,437 तरुण आहेत तर 10,199 श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे ज्यांना पेंशन मिळत आहे, पंजाब सरकार वृद्धत्व पेंशन योजने नुसार 500 रुपये पेंशन देतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews